निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे पुरवून फसवणुक, गुन्हा दाखलतुळजापूर: बियाणे बाबतच्या तक्रारीच्या अनुशंगाने बियाणे निरीक्षक तथा कृषी अधीकारी, तुळजापूर श्री सतिश मारुती पिंपरकर यांनी तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाउन पिक पाहणी केली. यावेळी त्यांना 17- 33 % बियाणाची उगवण झाल्याचे दिसुन आले. 

वरदान बायोटेक प्रा.लि., बसंत बिहार, उज्जैन, राज्य- मध्यप्रदेश बियाणे उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक- भिमराव शिवाजी नागरगोजे यांच्या कंपनीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना दर्जाहीन सोयाबीन बियाणे पुरवठा करुन शेतकऱ्यांची व शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या श्री सतिश पिंपरकर यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वर नमूद कंपनी विरुध्द भा.दं.सं. कलम- 420 सह बी- बियाणे कायदा व बी- बियाणे नियम अन्वये पो.ठा. तुळजापूर येथे दि. 14.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments