Header Ads

तुळजापूर : अपघातात पुरुष मयततुळजापूर: नामदेव तात्याराव मोरे, वय 55 वर्षे, रा. तीर्थ (बु.), ता. तुळजापूर हे दि. 17.06.2020 रोजी रात्री 20.00 वा. सु. मौजे तीर्थ (बु.) येथील शासकीय शेळी- मेंढी विकास महामंडळ प्रकल्प समोरील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी गावातीलच भरत बिरु धर्मसाले यांनी मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 4394 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून नामदेव मोरे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघतात नामदेव मोरे यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने ते वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले आहेत. अशा मजकुराच्या विशाल नामदेव मोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भरत धर्मसाले यांच्याविरुध्द दि. 12.07.2020 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मारहाण

 नळदुर्ग:            घरा समोरील सेलफोन मनोऱ्यास (टॉवर) कुंपन न करण्याच्या कारणावरुन मौजे कार्ला, ता. तुळाजापूर येथील देवकर कुटूंबीयांतील रघुनाथ रामा देवकर, रामा, मारुती, समाधान देवकर यांच्या गटाचा गावातीलच आपले देवकर कुटूंबीय भाऊबंद- जिवन गोरख देवकर, सुनिल, नागनाथ, नवनाथ यांच्या गटाशी दि. 11.07.2020 रोजी 07.30 वा. सु. दोन्ही गटांनी परस्परांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, तलवारीने, लोखंडी गजाने, पाईपने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी परस्पर विरोधी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दोन्ही गटातील सदस्यांवर भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये पो.ठा. नळदुर्ग येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 12.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


चोरी

बेंबळी: भिमाशंकर चनबस पाटील, रा बामणी, ता. उस्मानाबाद यांच्या मौजे बामणी शेतगट क्र. 91 मधील शेळी पालन शेडचा पत्रा अज्ञात चोरट्याने दि. 12.07.2020 रोजी मध्यरात्री कापून कळपातील 9 बोकड एकुण किं.अं. 45,000/-रु. चे चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या भिमाशंकर पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 13.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments