Header Ads

येडशी क्वारंटाईन सेंटर मध्ये जंगी पार्टी करून एकाची आत्महत्याउस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील येडशीमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. तिरुपतीहुन गावी आलेल्या आणि  क्वारंटाईन करण्यात आलेल्या एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.  विशेष म्हणजे क्वारंटाईन सेंटर मध्ये जँगी पार्टी झाल्याचे वृत्त आहे.

 येडशी येथील सरपंचासह सहाजण आणि बार्शी तालुक्यातील तीन असे नऊ जण दोन जुलै रोजी तिरुपतीला एकाच गाडीमध्ये गेले होते. म्हणजे या ९ जणांनी प्रशासनाची दिशाभूल करुन ऑनलाईन पास काढून घेतले. त्यानंतर हे सर्वजण तिरुपतीहून सोमवारी आपल्या गावी परत दाखल झाले.

 गावामध्ये आल्यानंतर येडशी ग्रामस्थांनी या सहा जणांना क्वारंटाईन होण्याची विनंती केली. मात्र सरपंचासह इतर पाच जणांनी त्यास नकार दिला. त्यानंतर ग्रामस्थ एकत्र जमल्याने आणि अधिकाऱ्यांच्या कानावर ही माहिती गेल्याने त्यांनाक्वारंटाईन करण्यात आले. मात्र गावातील अनेकजण त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जात होते. विशेष म्हणजे या सहा जणांनी कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा केली. त्यामुळे प्रशासनाकडून पोलिसांना याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला. तर या सहा जणांनी क्वारंटाईन कक्षातच जंगी पार्टी केल्याचे बोलले जात आहे.

पार्टीच्या दिवशीच सहा जणांपैकी एकाने औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला पुण्यात हलविण्यात आले. त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूणच यामध्ये मोठे गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. क्वारंटाईन असताना पार्टी केलीच कशी? असा प्रश्न गावकऱ्यातून विचारला जात आहे.

 या सर्व  प्रकरणाची  चौकशी होऊन संबंधित दोषीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून येत आहे. आता पोलीस प्रशासन स्तरावर याची कशी चौकशी केली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर बार्शी तालुक्यातील तिघेजण येडशीला आले कसे? नाकाबंदी असताना त्यांना प्रवेश दिला कसा? याचीही चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

2 comments

pravin pandit said...

कृृृपया...कडक नियम सर्वांना करा...
पोलिस हे सध्या देवमाणसं आहेत..तर काहीजण पैश्यासाठी..चुकीचे काम पण करतायेत.....

ashokshendge said...

कृपया पोलिसाना सहकार्य करा .