चोरीस गेलेले मद्य जप्त, आरोपी अटकेतस्थानिक गुन्हे शाखा: किर्ती जमदाडे रा. काटी, ता. तुळजापूर यांच्या मौजे काटी येथील शेत गट क्र. 242 मधील देशी दारु दुकानातील देशी दारु 1,002 बाटल्या व बिअरच्या 12 बाटल्या व सीसीटीव्ही चा मेमरी बॉक्स (डीव्हीआर) एकुण किं.अं. 47,462/- रु चा माल दि. 13.05.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता. यावरुन पो.ठा. तामलवाडी येथे गु.र.क्र. 76 / 2020 दाखल आहे.

सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खबरेच्या आधारे आरोपी- भानुदास उत्तम काळे, वय 40 वर्षे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर यास दि. 23.07.2020 रोजी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेलेल्या नमूद माला पैकी 180 मि.ली. देशी दारुच्या 48 बाटल्या व चोरी करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल जप्त केली असुन पुढील कारवाईस्तव आरोपीस पो.ठा. तामलवाडी च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि  पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.

No comments