उस्मानाबाद : हरवलेले 11 मोबाईल फोन शोधुन मुळ मालकांस परत
उस्मानाबाद -  मोबाईल फोन हरवल्या संदर्भात जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत अनेक तक्रारी प्राप्त आहेत. त्या मोबाईल फोनचा ऑनलाईन शोध घेण्याचे काम सायबर पोलीस ठाण्या मार्फत केले जाते. अशाच प्रकरणातील 11 मोबाईल फोन हे इतरत्र वापरात असल्याचे सायबर पोलीसांच्या निदर्शनास आले.

 या मोबाईल फोन वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना पुरवण्यात आली. स्था.गु.शा. च्या  पथकाने वापरकर्त्यांशी संपर्क साधुन त्यांच्या ताब्यातून ते 11 मोबाईल फोन एकुण किं.अं. 2,05,000 ₹ जप्त केले. हे मोबाईल फोन आज दि. 22.07.2020 रोजी मा. पोलीस अधीक्षक . राज तिलक रौशन यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी स्था.गु.शा. चे पो.नि. श्री दगुभाई शेख, सायबर पो.ठा. चे सपोनि- श्री सचिन पंडीत यांच्यासह मोबाईल मालक- अनामिका गोरे, कृष्णा दहीहांडे, श्रीधर जगदाळे, संतोष तौर, समाधान राठोड, रमेश बांगर, अब्दुल्ला चाऊस, प्रविण धावारे, अजीरखान पठाण असे हजर होते. आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने त्यांनी उस्मानाबाद पोलीसांचे आभार व्यक्त केले.

मोबाईल फोन शोध मोहिम  पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख, सायबर पो.ठा. चे सपोनि श्री. सचिन पंडीत, पोहेकॉ- किशोर रोकडे, पोना- दिपक लाव्हरेपाटील, पोकॉ- पांडुरंग सावंत, मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे.   

चोरीस गेलेला मोबाईल फोन जप्त, आरोपी अटकेत चोरीस गेलेल्या / हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध ऑनलाईन शोध सायबर पो.ठा. मार्फत घेतला जातो. अशाच प्रकरणी तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 41 / 2017 भा.दं.सं. कलम- 380 या गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग मोबाईल फोन हा महेश चिदानंद काळजे रा. उस्मानाबाद हा वापरत असल्याचे सायबर पो.ठा. च्या निदर्शनास आले. त्या माहितीच्या आधारे महेश काळजे यास दि. 22.07.2020 रोजी स्था.गु.शा. च्या पथकाने ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद सॅमसंग मोबाईल फोन किं.अं. 11,000/-रु. जप्त करुन त्यास पुढील कार्यवाहीस्तव पो.ठा. तामलवाडी च्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. सचिन पंडीत, श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे, पोकॉ- मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे.

No comments