उस्मानाबाद : 3 वर्षापुर्वी चोरीस गेलेला मोबाईल फोन जप्त, आरोपी अटकेत
उस्मानाबाद  - तीन वर्षांपूर्वी एकाचा मोबाईल चोरणाऱ्या समर्थनगर भागातील एका चोरट्यास स्थानिक पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला  मोबाईल जप्त केला आहे. 

उस्मानाबाद शहर  पो.ठा. गु.र.क्र. 79 / 2017 भा.दं.सं. कलम- 380 या गुन्ह्यातील चोरीस गेलेला ओप्पो मोबाईल फोनसह (किं.अं. 8,500/-रु.) आरोपी- साबेर शहाबुद्दीन शेख, वय 23 वर्षे, रा. समर्थनगर, उस्मानाबाद यास दि. 20.07.2020 रोजी स्था.गु.शा. च्या पथकाने सायबर पो.ठा. च्या मदतीने ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद मोबाईल फोन जप्त केला असुन पुढील कार्यवाहीस्तव त्यास पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे, पोकॉ- मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे.  

2 comments

Shashikant Maske said...

खरंच मिळतो चोरीला गेलेला मोबाईल फोन

Unknown said...

चोरीला गेलेला मिळाला हे कस शक्य आहे मला माझ्या मोबाइल पण 3पूर्ण होऊन गेली पण मिळालेले नाही म्हणुन नवल वाटत आहे