Header Ads

बाहेर जिल्ह्यातून चोरलेल्या 5 मोटारसायकलसह संशयीत ताब्यात
उस्मानाबाद -  पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी गंभीर गुन्ह्यातील पाहिजे- फरारी आरोपींचा शोध मोहिम उघडली आहे. त्या अनुशंगाने दि. 01.07.2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चे पथक पाहिजे- फरारी आरोपींच्या शोधकामी परंडा तालुक्यात गस्त करत होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, मौजे खामगांव, ता. बार्शी येथील एका युवकाने चोरीच्या मोटारसायकल शिराढोण पो.ठा. हद्दीतील मौजे नागझरवाडी उस्मानाबाद येथे विकल्या आहेत. तो युवक आज दि. 01.07.2020 रोजी कौडगांव -बार्शी रस्त्याने परत जात आहे.


पथकास मिळालेल्या बातमी- वर्णनाच्या आधारे पथकाने बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दुपारी सापळा लावला. दरम्यान बाजार समितीच्या दरवाजा जवळून जाणाऱ्या संशयीताचा बांधा- पेहराव खबऱ्याकडून प्राप्त माहिती- वर्णनाशी जुळत असल्याने पोलीसांनी त्या युवकास ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता त्याचे नाव- सागर श्रीमंत सुरवसे, वय 23 वर्षे, रा. खामगांव, ता. बार्शी असे असल्याचे समजले. पथकाने त्यास ताब्यात घेउन मौजे नागझरवाडी येथे त्याने विकलेल्या 5 मोटारसायकल जप्त केल्या. सदर मोटारसायकलचा मालकी- ताबा याबाबत तो समाधान कारक माहिती देउ शकला नाही. यावरुन पोलीसांनी त्या मोटारसायकलचा चासी- इंजीन क्रमांकाच्या आधारे नोंदणी क्रमांक शोधले.


 यापैकी 1) एम.एच. 12 केयु 8335 2) एम.एच. 17 बीपी 5081 या दोन मो.सा. वगळता अन्य 3 मोटारसायकल या चोरीस गेल्या असुन त्यासंबंधी खाली नमूद गुन्हे दाखल असल्याचे समजले.

1) पो.ठा. बार्शी (श.) गु.र.क्र. 130/2020 हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 13 बीसी 0272.
2) पो.ठा. कुर्डुवाडी गु.र.क्र. 217/2019 हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 45 एजी 0258.
3) पो.ठा. लातूर (एम.आय.डी.सी) गु.र.क्र. 45/2020 होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 12 केझेड 3886.
उर्वरीत तपासकामी संशयीत- सागर श्रीमंत सुरवसे यास पो.ठा. शिराढोण च्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, विजय घुगे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, पोकॉ- पांडुरंग सावंत, सचिन दशवंत यांच्या पथकाने केली आहे. 

Osmanabad Live News App

No comments