Header Ads

उस्मानाबादेत जागेच्या वादातून एकाचा खून उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहरातील समर्थनगर भागात  जागेवरून हाणामारी होऊन त्यात एकजण मयत झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रघुनाथ खळदकर, रा. समर्थनगर, उस्मानाबाद यांनी समर्थनगर येथील आपल्या मालकीचा प्लॉट व गाळ्याची जागा दिपक जोतीराम भातमांगे, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांना विक्री केला होता. दि. 07.07.2020 रोजी 15.00 वा. सु. दिपक भातमांगे यांसह त्यांची आई व अन्य 2 महिला असे चौघे खरेदी केलेल्या नमूद जागेचा ताबा घेण्याकरीता त्या ठिकाणी राहत असलेल्या भाडेकरुचे सामान बाहेर टाकू लागले. यावर रघुनाथ खळदकर यांचा मुलगा- प्रकाश, सुन- प्रज्ञा या दोघांनी सामान फेकून देण्यास अडवनूक केली असता नमूद चौघांनी प्रकाश खळदकर, वय 48 वर्षे व प्रज्ञा यांना धक्काबुक्की करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व प्रकाश यांना फरशीवर ढकलून दिले. यात प्रकाश खळदकर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या प्रज्ञा खळदकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दंसं. कलम- 302, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे  

No comments