चोरीस गेलेला विद्युत पंप जप्त, 2 आरोपी अटकेतउस्मानाबाद : तुकाराम धनाजी चव्हाण, रा. जहागीरदारवाडी तांडा, ता. उस्मानाबाद यांच्या शेतातील विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप व त्याला जोडलेली वायर (किं.अं. 10,000/-रु.) हे दि. 21.05.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. यावरुन पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे गु.र.क्र. 151/2020 दाखल आहे.

सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खबरेच्या आधारे आरोपी- 1) बालाजी भगवान पवार, वय 35 वर्षे, 2) सिताराम पोपट पवार, वय 22 वर्षे, दोघे रा. पारधी पिढी, वरुडा, ता उस्मानाबाद या दोघांना दि. 16.07.2020 रोजी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला नमूद मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील कारवाईस्तव नमूद दोघांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.

No comments