Header Ads

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल उमरगा: जयवंत नागोराव कुलकर्णी, रा. डिग्गी रोड, उमरगा हा दि. 16.07.2020 रोजी 16.00 वा. सु. उमरगा, तहसिल कार्यालया समोरील न्यायालयाच्या ईमारतीवर चढुन मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले उमरगा पो.ठा. चे पोकॉ- चंद्रकांत फडतरे व अन्य शासकीय कर्मचारी हे जयवंत कुलकर्णी यास ईमारतीवरुन खाली उतरवण्याकरीता त्याच्या जवळ गेले. यावेळी त्याने फडतरे यांसह अन्य कर्मचाऱ्यांस धक्काबुक्की केली. तसेच त्याने तहसिल कार्यालयात जाउन गोंधळ घालून आत्महत्या करणार असल्याचे धमकावले. अशा प्रकारे त्याने पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा केला. यावरुन पोकॉ- फडतरे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपीविरुध्द भा.दं.सं. कलम- 309, 353, 332, 504 सह, म.दा.का. कलम- 85 (1) सह, म.पो.का. कलम- 110/ 117 अन्वये गुन्हा दि. 16.07.2020 रोजी नोंदवला आहे.


अपघात
पोलीस ठाणे, आनंदनगर: रिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0130 चा चालक- बालाजी मारुती कदम, रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद याने दि. 11.07.2020 रोजी 14.30 वा. सु. उस्मानाबाद येथील रामानंद हॉटेल समोरील रस्त्यावर रिक्षा निष्काळजीपणे, हयगईने चालवल्याने तो अनियंत्रीत होउन पलटला. यात पाठीमागे बसलेले गावातीलच- गणेश श्रीधर शिंदे, वय 35 वर्षे, हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मोहन नामदेव शिंदे, रा. शिंगोली यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद रिक्षा चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 16.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments