कंटेनमेंट झोन मधून बाहेर जाणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखलपो.ठा., उमरगा: उमरगा शहरातील हमीदनगर हे कोविड- 19 संसर्गाच्या रुग्णामुळे प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केले आहे. असे असतांनाही सोहेल इसाक शेख, रा. आझाद चौक, हमीदनगर, उमरगा हे दि. 20.07.2020 रोजी प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर विनाकारण गेले. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 संसगास आळा बसण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य प्रतिबंधक कारवाया

पो.ठा., मुरुम: एक अनोळखी व्यक्ती दि. 20.07.2020 रोजी मौजे दाळींब- काळनिंबाळा रस्त्यावर होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 9334 वर दारुची अवैध वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल लागताच तो मोटारसायकल जागेवर सोडून पळून गेला. पोलीसांनी सदर ठिकाणाहून नमूद मो.सा. सह तीच्यावरील दोन लबरी नळ्यांमधील 40 ली. गावठी दारु (किं.अं. 2,000/-रु.) जप्त केली आहे. यावरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द पो.ठा. मुरुम येथे गुन्हा नोंदवला आहे.

पो.ठा., शिराढोण: उत्तम फकीरा एडके, रा. देवळाली, कळंब हा दि. 21.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 15 ली. गावठी दारु (किं.अं. 975/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. शिराढोण च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. शिराढोण येथे गुन्हा नोंदवला आहे.

जुगार प्रतिबंधक कारवाई

पो.ठा., उस्मानाबाद (श.): 1)मकबुल रसुल टकारी, रा. रसुलपुरा 2)चॉद इब्राहीम शेख, रा. फकीरानगर, उस्मानाबाद हे दोघे दि. 20.07.2020 रोजी वैरागनाका, उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 3,400/-रु. कब्जात बाळगले असतांना पो.ठा. स्था.गु.शा. च्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोघांविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चोरी

पो.ठा., उस्मानाबाद (श.): साठेनगर, उस्मानाबाद येथील आंगणवाडी क्र. 25 च्या खोलीचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 11 ते 19.07.2020 च्या दरम्यान तोडून आतील पोषण आहाराचे गहु, हरभरा, मसुर डाळ, खाद्यतेल (किं.अं. 3,200/-रु.) चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या आंगणवाडी सेविका- आरती जयशेट्टे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अन्वये गुन्हा दि. 21.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments