Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल नळदुर्ग: भिमराव गुराप्पा आरळे व अन्य 6 व्यक्ती सर्व रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर यांचा गावकरी- गणेश मनोहर दुधभाते व अन्य 7 व्यक्ती यांच्यात शेतातील वाटेच्या कारणावरुन दि. 06.07.2020 रोजी 21.00 वा. सु. मौजे धनगरवाडी येथे वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच भिमराव आरळे यांच्या गटातील व्यक्तींनी गणेश दुधभाते यांच्या घराच्या दरवाजावर दगड मारुन नुकसान केले तर गणेश दुधभाते यांच्या गटातील व्यक्तींनी भिमराव आरळे यांच्या घरा समोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा व चारचाकी वाहनाच्या काचेवर दगड मारुन नुकसान केले.
अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. नळदुर्ग येथे दि. 07.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


बेंबळी: किरण राजाराम लोमटे, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद हे दि. 23.06.2020 रोजी 08.30 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी मौजे गौडगाव, ता. उस्मानाबाद येथील भोसले कुटूंबातील- मयुर भोसले, अशोक, शाम, शुभम, अशोक, बालाजी, तानाजी, जगन, नानासाहेब, सोन्या या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून किरण लोमटे यांच्या शेतात जाउन आमच्या शेतगड्याला कामाला बोलवायचे नाही वा त्याच्याकडून पैसे घ्यायचे नाही. असे बजावून किरण लोमटे यांच्या हातावर व पायावर विळ्याने, काठीने मारहाण करुन जखमी केले. किरण लोमटे यांना वाचवण्यास आलेल्या त्यांच्या कुटूंबीयांसही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किरण लोमटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.

परंडा: तौफीक ईस्माईल शेख, रा. मंगळवार पेठ, परंडा यांनी त्यांच्या कबुतरास टाकलेले धान्य शेजारील- खाँजा बापु शहाबर्फीवाले यांच्या शेळ्यांच्या पिल्लांनी खाल्याचे कारणावरुन दि. 05.07.2020 रोजी 09.30 वा. सु. मंगळवार पेठ येथे तौफीक शेख याने खाँजा शहाबर्फीवाले यांना छाती- पोटावर सुऱ्याने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या खाँजा शहाबर्फीवाले यांच्या फिर्यादीवरुन तौफीक शेख याच्याविरुध्द गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments