उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, ढोकी: विलास ज्ञानदेव धाबेकर, रा. दुधगाव, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराच्या गेट- दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 24.07.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील रोख रक्कम, सोने- चांदीचे दागिने व मोबाईल फोन असा एकुण 1,13,000/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या विलास धाबेकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 25.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, मुरुम: आप्पाशांत राजशेखर हिरमुखे, रा. भुसणी, ता. उमरगा यांच्या शेतातील पत्रा शेडचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 25.07.2020 रोजी रात्री तोडून आतील 5 शेळ्या, 2 बोकड व 12 कबुतरे (एकुण किंमत 45,000/-रु.) चोरुन नेली आहेत. अशा मजकुराच्या आप्पाशांत हिरमुखे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): गहीनीनाथ खंडागळे, रा. बारातेवाडी, ता. कळंब यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 13 एए 1174 ही मौजे येडशी शिवारातील इंगळे ढाबा येथे दि. 28.02.2020 रोजी लाउन मुंबई येथे गेले होते. परत येउन दि. 05.07.2020 रोजी पाहीले असता ती मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या गहीनीनाथ खंडागळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments