Header Ads

मनाई आदेश झुगारुन दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर पोलीसांतर्फे 4 गुन्हे दाखल उमरगा: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उमरगा नगरपालीका हद्दीत दि. 06.07.2020 ते 10.07.2020 या काळात मनाई आदेश अंमलात आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन दि. 08.07.2020 रोजी 11.00 ते 12.30 वा. चे दरम्यान 1)फिरोज खाजामियॉ ईनामदार, रा. जकेकुर, ता. उमरगा 2)संजय सिद्राम दळगडे, रा. उमरगा 3)विरभद्र दयानंद स्वामी 4)हरी रुकमन्ना चव्हाण, तीघे रा. उमरगा अशा चौघांनी उमरगा शहरात वेगवेगळ्या चार ठिकाणी चहाचे स्टॉल व्यवसायास चालू ठेवल्याचे उमरगा पो.ठा. यांच्या पथकास आढळले. यावरुन पो.ठा. उमरगा चे पोकॉ- उत्कर्ष चव्हाण यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब), सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये स्वतंत्र 4 गुन्हे दि. 08.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments