Header Ads

१७ वर्षाच्या मुलावर सहा तरुणांकडून आळीपाळीने लैंगीक अत्याचारउस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील 6 तरुणांनी गावातीलच 17 वर्षीय मुलास (नाव- गाव गोपनीय) दि. 24.03.2020 ते 22.07.2020 या कालावधीत वेळोवेळी धमकावून त्याचे लैंगीक शोषण केले. अशा मजकुराच्या पिडीत बालकाच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत 6 तरुणांविरुध्द भा.दं.सं. कलम- 377, 506, 34 सह बाललैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम- 4, 6, 12 अन्वये गुन्हा दि. 22.07.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.
पो.ठा., उमरगा: राम किसनराव बिराजदार, रा. बेटजवळगा, ता. उमरगा हे दि. 22.07.2020 रोजी 13.30 वा. चे दरम्यान पतंगे रोड, उमरगा येथील टपाल कार्यालया समोर त्यांची ॲक्टीव्हा स्कुटर लावून टपाल कार्यालयात गेले होते. दरम्यान त्यांच्या स्कुटरच्या डिकीतील 2,00,000/-रु. व कुटूंबातील सदस्यांचे बँक पासबुक असलेली पिशवी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या राम बिराजदार यांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 23.07.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण.
पो.ठा., शिराढोण: सुरेश सुखदेव मुंढे, रा. गोविंदपुर, ता. कळंब यांनी दि. 21.07.2020 रोजी 19.30 वा. सु. मौजे गोविंदपुर येथे गावातीच- सुनिल बाळु पाटोळे यांना आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन काठीने मारहाण केली. मारहाण सोडवण्यास आलेल्या सुनिल पाटोळे यांच्या आई- वडींलासही सुरेश मुंढे यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन, विटाने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुनिल पाटोळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सुरेश मुंढे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 सह ॲट्रॉसीटी कायदा अन्वये गुन्हा दि. 22.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments