नळदुर्ग : विनापरवाना विवाह सोहळा आयोजित करुन गर्दी जमवली, गुन्हा नोंद
नळदुर्ग: कोविड- 19 साथीमुळे विवाह सोहळ्याच्या आयोजनास जिल्हा प्रशासनाची परवानगी व व्यक्तींची संख्या निश्चीती- बंधनकारक करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करुन मुबारक चॉद इनामदार, वय 37 वर्षे, रा. उमरगा (चि.), ता. तुळजापूर यांनी दि. 27.06.2020 रोजी दुपारी 09.00 वा. मौजे उमरगा (चि.) येथे विवाह सोहळ्याचे आयोजन केले. तसेच सोहळ्यात उपस्थितांची गर्दी निर्माण करुन कोविड- 19 आजाराच्या संसर्गाची शक्यता निर्माण केली. यावरुन ग्रामसेवक- श्री गोरोबा भिमा गायकवाड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुबारक इनामदार यांच्याविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे दि. 27.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.जुगार प्रतिबंधक कारवाई


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): गोपनीय माहितीच्या आधारे पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पोलीस पथकाने म्हसोबा चौक, उस्मानाबाद येथे असणाऱ्या ‘संगीत हॉटेल’ वर दि. 27.07.2020 रोजी 21.35 वा. छापा टाकला. यावेळी तेथे 1)जुबेर शेख 2)शाहरुख पठाण 3)अलताफ शेख 4)संजय माने 5)अजीम पठाण 6)अन्सार शेख 7)समीर शेख 8)मुक्तार शेख 9)पाशुमीयॉ शेख 10)सुनिल चव्हाण 11)पुरखॉन बागवान 12)सत्तार पटेल 13)नजीमोद्दीन शेख 14)वाजीद शेख 15)वसीम बागवान 16)आयासउद्दीन शेख 17)अजिम शेख 18)फेरोज शेख तिरट जुगार खेळत असतांना आढळले. यावरुन पोलीसांनी रोख रक्कम, जुगार साहित्य, वाहने, मोबाईल फोन असे एकुण 4,04,850/-रु. चाल माल जप्त करुन वरील 18 व्यक्तींविरुध्द म.जु.का. कलम.- 12 (अ) सह भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments