Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल  भुम: सुधीर गावडे, रा. पाथ्रुड यांनी दि. 07.07.2020 रोजी 20.30 वा. सु. मौजे उमाचीवाडी, ता. भुम येथील रामा शेळके यांच्या घरा समोरील रस्त्यावर मोटारसायकल लावली होती. या कारणावरुन रामा शेळके यांसह शेळके कुटूंबीतील- गोकूळ, संदीपान, हनुमंत, विलास हे सर्व सुधीर यास मारहाण करत असतांना सुधीर यांचे चुलते- सुभाष विश्वनाथ गावडे यांनी मारहाण करण्याचा जाब विचारला. यावर नमूद आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व रामा शेळके यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सुभाश गावडे यांच्या पोटात चाकु खुपसला. तसेच मारहाण सोडवण्यास आलेल्या सुभाष गावडे यांच्या कुटूंबीयांस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुभाष गावडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारकामी दवाखान्यात दाखल केले आहे.
            याच प्रकरणात हिराबाई शेळके, रा. उमाचीवाडी यांसह त्यांची जावू- सिमाबाई या दोघी दि. 07.07.2020 रोजी 20.50 वा. सु. आपल्या राहत्या घरी असतांना गावातील गावडे कुटूंबातील सदस्य- हनुमंत, विनोद व तानाजी काळवडकर, रा. दुधोडी, मौजे पाथ्रुड येथील भाऊसाहेब गावडे, विलास गावडे, सुधीर गावडे, बालाजी तिकटे अशा  सात व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून हिराबाई व सिमाबाई यांच्या घरात घुसून त्या दोघींना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.
            अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. भुम येथे दि. 08.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


 तुळजापूर: आकाश गणेश म्हेत्रे, रा. सारोळा, ता. तुळजापूर हे दि. 21.05.2020 रोजी 20.30 वा. सु. बस स्थानक, सारोळा येथे थांबले होते. यावेळी गावातील धाकतोडे कुटूंबातील- सोमनाथ, ज्ञानेश्वर, समाधान, राजु अशा चौघांनी आकाश म्हेत्रे यांना मारहाण करुन त्यांच्या शर्टच्या खिशातील 4,750/-रु. रोख रक्कम जबरीने काढून घेतले. तसेच पोलीसांत तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आकाश म्हेत्रे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 394, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 08.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments