Header Ads

भोंदू साधूचा एकावर लैंगीक अत्याचार
 नळदुर्ग:  नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात एका भोंदू साधूने एका पुरुषावर  लैंगीक अत्याचार करून साधू फरार झाला आहे. त्यामुळे या गावात एकच खळबळ उडाली आहे. 

नाशिक येथुन उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात येउन राहणाऱ्या एका साधुने (नाव- गाव गोपनीय) दि. 07.07.2020 रोजी 01.00 वा. सु. सेवा करत असलेल्या 55 वर्षीय पुरुषाचे (नाव- गाव गोपनीय) लैंगी शोषण केले आहे. अशा मजकुराच्या पिडीत पुरुषाच्या फिर्यादीवरुन त्या साघूविरुध्द भा.दं.सं. कलम- 377 अन्वये गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.

अपघात

मुरुम: मेघराज तुकाराम माने, रा. अचलेर, ता. लोहारा यांनी मौजे अचलेर येथील त्यांच्या सिमेंट विटा बणवण्याच्या कारखान्याच्या तारेच्या कुंपनास विद्युत बोर्ड बांधला होता. त्यामुळे त्या कुंपनात विद्युत प्रवाह उतरुन त्या कुंपनास शिवानंद बिराप्पा चेंडके, वय 18 वर्षे, रा. अचलेर यांची मेंढी चिकटल्याने ती काढण्यास शिवानंद गेला असता तो ही त्या कुंपनास चिटकुन विद्युत झटक्याने मयत झाला आहे. अशा मजकुराच्या लक्ष्मण बिराप्पा चेंडके (मयताचा भाऊ) यांच्या प्रथम खबरेवरुन मेघराज माने यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 304 (अ) अन्वये गुन्हा दि. 08.07.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी

 ढोकी: मन्मथ सुभाष आवटे, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद यांनी त्यांची बुलेट मो.सा. क्र. एम.एच. 25 एई 8282 ही दि. 05.07.2020 रोजी रात्री 23.00 वा. च्या सुमारास आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. दि. 0607.2020 रोजी 06.00 वा. ती मो.सा. त्यांना लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या मन्मथ आवटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्‍द गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments