शिराढोण : प्रेताची अवहेलना करणाऱ्यावर गुन्हा दाखलपोलीस ठाणे, शिराढोण: प्रकाश वैजनाथ नाईकनवरे, वय 35 वर्षे, रा. ढोराळा, ता. कळंब यांचा शेतात गळफासाने मृत्यु झाला होता. वसंत पांडुरंग नाईकनवरे, रा. ढोराळा यांनी दि. 26.07.2020 रोजी सायंकाळी मृतदेहाच्या गळफासाची दोरी मोटारसायकलला बांधून तो मृतदेह ओढत नेउन प्रेताची अवहेलना केली. अशा मजकुराच्या वैजनाथ साधु नाईकनवरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वसंत नाईकनवरे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 297 अन्वये गुन्हा दि. 27.07.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी

पोलीस ठाणे, आंबी: बाबु बळी जाधव, रा. आंबी, ता. भुम यांच्या राहत्या घरातील पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 1,09,000/-रु. व महत्त्वाची कागदपत्रे तसेच बाबु जाधव यांच्या शेजारील दिलीप किसनराव पाटील यांच्या घरातील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 32,100/-रु. चा माल तर उत्तम केरबा गायकवाड यांच्याही घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 81,000/-रु. किंमतीचा माल दि. 27.07.2020 रोजी सकाळी 06.00 वा. चे पुर्वी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या बाबु जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा दि. 27.07.2020 रोजी नोंदवला आहे.


मारहाण

पोलीस ठाणे, ढोकी: महालिंग नागु कोरे, रा. कोंड, ता. उस्मानाबाद हे आपल्या कुटूंबासह गावातीलच आपल्या दुकानात दि. 27.07.2020 रोजी दुपारी होते. यावेळी यावेळी नामदेव कदम, रा. ढाकणी, ता. लातुर  प्रशांत नागु जाधव रा. कोंड यांच्यासह 8 व्यक्तींनी किराणा दुकानाची जागा मोकळी करण्याच्या कारणावरुन महालिंग कोरे यांसह त्यांची पत्नी- विमल, मुलगा- रामेश्वर यांस शिवीगाळ करुन, काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या महालिंग कोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत 8 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 143, 147, 148, 149 सह म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments