पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, 3 व्यक्तींवर गुन्हा दाखलपो.ठा., उस्मानाबाद (श.): कोविड- 19 संदर्भाने अंमलात असणाऱ्या मनाई आदेशांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुध्द उस्मानाबाद (श.) पो. ठा. चे पोलीस पथक दि. 22.07.2020 रोजी 18.20 वा. सु. देशपांडे स्टँड, उस्मानाबाद येथे कारवाई करत होते. यावेळी मनाई आदेशांचे उल्लंघन करुन असिफ अकील शेख, रा. उस्मानाबाद याच्यासह अन्य 2 व्यक्ती असे एका मोटारसायकलवर बसून, मोबाईल फोन वर बोलत तसेच विनामास्क फिरत असल्याने पथकाने त्यांना हटकले. यावर त्या तीघांनी पोलीसांसोबत हुज्जत घालून कारवाई न करण्यास धमकावले.
            अशा प्रकारे त्या तीघांनी मनाई आदेशांचे उल्लंघन करुन तसेच पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन सपोनि- श्री शंकर सुर्वे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 189, 269, 34 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह मो.वा.का. कलम- 250 (अ) / 177 अन्वये गुन्हा दि. 22.07.2020 रोजी नोंदवला आहे.
अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., उमरगा: गोविंद दादाराव जाधव, रा. कदेर, ता. उमरगा हा दि. 22.07.2020 रोजी मौजे कदेर शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 650/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला. पोलीसांनी नमूद अवैध मद्य जप्त करुन त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.


 “जुगार प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., लोहारा: 1)सचिन राठोड 2)पंडीत पवार 3)मुकेश पवार 4)धनराज जाधव 5)अर्जुन राठोड सर्व रा. आनंदनगर तांडा, खेड, ता. लोहारा हे सर्व दि. 22.07.2020 रोजी आनंदनगर तांडा शिवारातील शेतात तिरट जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 2,800/-रु. कब्जात बाळगले असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द पो.ठा. लोहारा येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


No comments