Header Ads

नळदुर्ग: आत्महत्येस प्रवृत्त केले, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, नळदुर्ग: काजल मालोजी आडसुळ, वय 19 वर्षे, रा. गंधोरा, ता. तुळजापूर या दि. 03.07.2020 रोजी 09.00 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर होत्या. यावेळी कॉलनीतीलच- सुरेश जेटीथोरे, किरण जेटीथोरे, मोहन जेटीथोरे, रावण जेटीथोरे, राहुल जेटीथोरे, विठ्ठल जेटीथोरे, किरण मस्के, विठ्ठल मस्के, ललीता मस्के या सर्वांनी काजल आडसुळे यांच्या घरा समोर जाउन पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन काजल यांसह पती- मालाजी आडसुळे व आई- वडील यांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या त्रासास कंटाळून काजल आडसुळे यांनी गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मालाजी आडसुळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 03.07.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार अड्यावर छापा.
पो.ठा., नळदुर्ग: सतिश मारुती माने, रा. आष्टा कासार, ता. लोहारा हा दि. 04.07.2020 रोजी बस स्थानक नळदुर्ग च्या पाठीमागील शेडमध्ये कल्याण मटका जुगार खेळत व खेळवित असतांना कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 1,780/-रु. च्या मालासह पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विक्री विरोधी कारवाया.
पो.ठा., कळंब: जयश्री शिंदे, रा. ईटकुर पारधी पिढी, ता. कळंब या दि. 03.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा जवळील पत्रा शेड मध्ये अवैध गावठी दारुची निर्मीती करत असतांना गावठी दारुचा 200 ली. द्रव पदार्थ व 10 ली. गावठी दारु एकुण किं.अं. 8,250/-रु. च्या मालासह पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळल्या. तर दुसऱ्या घटनेत शाम बापु काळे, रा. बाझार मैदान, कळंब हा आज दि. 04.07.2020 रोजी आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये विनापरवाना दारुचा विक्री व्यवसाय करत असतांना 180 मि.ली. देशी दारुच्या 41 बाटल्या किं.अं. 2,132/-रु. च्या मालासह पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळला. पोलीसांनी गावठी दारुचा नमूद द्रव पदार्थ घटनास्थळीच नष्ट करुन उर्वरीत दारु जप्त केली आहे.
       यावरुन वरील दोघा आरोपींविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. कळंब येथे नोंदवण्यात आले आहेत.
मोटार वाहन कायदा उल्लंघन: 309 कारवाया- 64,500 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.
उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 03/07/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 309 कारवाया करुन 64,500 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.

No comments