मद्य विक्री प्रतिबंधक 3 कारवायापोलीस ठाणे, लोहारा: एक अनोळखी व्यक्ती दि. 29.07.2020 रोजी 14.30 वा. सु. मौजे कास्ती (बु.) येथील एका मंगलकार्यालया जवळील रस्त्याने हिरो होंडा मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 1461 वर दारुची विनापरवाना वाहतुक करत असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल लागताच तो मो.सा. जागीच सोडून पळून गेला. पोलीसांनी घटनास्थळावरील देशी दारुच्या 67 बाटल्या (किं.अं. 4,020/-रु.) सह वाहतुकीस वापरलेली मो.सा. जप्त केली आहे. यावरुन संबंधीत अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: गोकुळ साहेबराव कोळी, रा. हिंगळजवाडी, ता. उस्मानाबाद हा दि. 29.07.2020 रोजी मौजे हिंगळजवाडी येथील संकल्प ढाबा येथे दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करत असतांना पो.ठा. ढोकी च्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल लागताच तो पळून गेला. पोलीसांनी घटनास्थळावरील देशी- विदेशी दारुच्या 11 बाटल्या जप्त केल्या असुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: व्यंकट श्रीधर सगर, रा. काळनिंबाळा (पुर्व), ता. उमरगा हा दि. 29.07.2020 रोजी आपल्या राहत्या घराच्या बाजूस दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या (किं.अं. 988/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला. यावरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

No comments