उस्मानाबाद : अवैध मद्य प्रतिबंधक कारवायापो.ठा., ढोकी: अनुसया अनिल पवार, रा. डकवाडी, ता. उस्मानाबाद या दि. 15.07.2020 रोजी डकवाडी शिवारातील आपल्या शेड समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळल्या. पोलीसांची चाहुल लागताचा त्या पळुन गेल्या. पोलीसांनी घटनास्थळावरील 180 मि.ली. च्या देशी दारुच्या 18 बाटल्या (किं.अं. 936/-रु.) जप्त केल्या असुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा नोंदवला आहे.

पो.ठा., नळदुर्ग: सुरेखा कृष्णा चव्हाण, रा. सलगरा (दि.), ता. तुळजापूर या दि. 16.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुची अवैध विक्री व्यवसाय करन्याच्या उद्देशाने 15 ली. गावठी दारु (किं.अं. 900/-रु.) कब्जात बाळगल्या असतांना पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळल्या.

स्थानिक गुन्हे शाखा: बंडु शंकर शिंदे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद हा दि. 15.07.2020 रोजी रामलिंग नगर, येडशी येथील आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास आढळला. पथकाने त्यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून 55 ली. गावठी दारु (किं.अं. 3,420/-रु.) जप्त केली असुन पुढील कार्यवाहीस्तव त्यास पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे हजर केले आहे.
            ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री दगुभार्द शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- दिपक लाव्हरेपाटील, बलदेव ठाकुर, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने केली आहे.


जुगार प्रतिबंधक कारवाया
पो.ठा., उस्मानाबाद (ग्रा.): ज्ञानेश्वर बापुराव वाळवे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद हा दि. 15.07.2020 रोजी मौजे येडशी बस स्थानक समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 420/-रु. सह पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या पथकास आढळला.
पो.ठा., उमरगा: शिवायनमहा शरनाप्पा लवारे, रा. उमरगा हा दि. 15.07.2020 रोजी उमरगा येथील प्रभात हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 750/-रु. सह पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.
       यावरुन नमूद दोघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments