Header Ads

चोरीच्या दोन मोटारसायकलसह दोघे ताब्यातउस्मानाबाद गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या पथकाने संशयीत 1) प्रशांत श्रीकांत शिंदे उर्फ बबलू, वय 19 वर्षे, 2) अंबादास शिंदे उर्फ राहुल, वय 20 वर्षे, दोघे रा. पिंपळगांव (क.), ता. वाशी या दोघांना दि. 06.07.2020 रोजी ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून प्रत्येकी एक हिरो ड्युएट स्कुटर व हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अशी दोन वाहने जप्त केली. दोन्ही वाहनांची मालकी- ताबा या विषयी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पथकाने त्या वाहनांच्या चासी- इंजीन क्रमांकावरुन मुळ मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी ही वाहने चोरीस गेल्या बाबत जामखेड पोलीस ठाणे, जि. अहमदनगर येथे 2 गुन्हे दाखल असल्याचे सांगीतले. उर्वरीत तपासकामी नमूद दोघा संशयीतांस पो.ठा. वाशी यांच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत तपासकामी अहमदनगर पोलीसांची मदत घेतली जाणार आहे.

            ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संताष गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.   

No comments