13 वर्षांपासुन फरार असलेले 2 आरोपी अटकेत
उस्मानाबाद : उस्मानाबाद (श.) पो.ठा. गु.र. क्र. 15/2007 भा.दं.सं. कलम- 457, 380 या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी- 1) ताजोद्दीन हुसेनसाब सय्यद, वय 31 वर्षे 2) बाशा हुसेनसाब सय्यद, वय 35 वर्षे, दोघे रा. मुरुड, जि. लातुर हे दोघे गेली 13 वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होते. त्‍यास स्था.गु.शा. च्या पथकाने खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. 16.07.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि.- श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.

No comments