Header Ads

कळंब : मनाई आदेश झुगारुन हॉटेल चालू ठेवले, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, कळंब: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश जारी केला आहे. असे असतांनाही मनाई आदेश झुगारुन महेश रामेश्वर सोनटक्के, रा. कळंब यांनी कळंब- येरमाळा रोडलगतचे ‘हॉटेल जानता राजा’ दि. 03.07.2020 रोजी 18.20 वा. सु. व्यवसायास चालू ठेउन हॉटेलात ग्राहकांना बसवून व्यवसाय केला.
यावरुन त्यांच्याविरुध्द कळंब पो.ठा. चे पोकॉ- शिवाजी राउत यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


मनाई आदेश झुगारुन निष्काळजीपणाची कृती केली, गुन्हा दाखल.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: धनंजय गायकवाड, आशोक गायकवाड, नामदेव पतंगे तीघे रा. सरमकुंडी, ता. वाशी हे तीघे दि. 04.07.2020 रोजी 00.10 वा. सु. बस स्थानक, नळदुर्ग समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर महिंद्रा पिक अप क्र. एम.एच. 25 एजे 1266 मध्ये नाका- तोंडास मास्क न लावता शेजारी दाटीवाटीने बसून प्रवास करत, असतांना पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळले. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 या रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असलेली निष्काळजीपणाची कृती केली आहे. यावरुन पोउपनि- श्री. कैलास लहाने यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तिघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मनाई आदेशांचे उल्लंघन 139 पोलीस कारवायांत 37,300/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 03.07.2020 रोजी खालील प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 70 कारवायांत- 14,000/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 4 कारवायांत- 2,500/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 13 कारवायांत 2,600/-रु. दंड प्राप्त झाला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 52 कारवायांत 18,200/- रु. दंड प्राप्त झाला आहे.


No comments