Header Ads

शासकीय रकमेचा अपहार, गुन्हा दाखलकळंब: मौजे खेर्डा, ता. कळंब येथील ग्रामपंचायतसाठी 14 व्या वित्त आयोग अंतर्गत सन- 2016- 17 मध्ये पाईप लाईन मंजुर झाली होती. 1)तत्कालीन शाखा अभियंता (नाव उपलब्ध नाही)  2)मुद्रीकाबाई साधुराम लिके, रा. खेर्डा, ता. कळंब (तत्कालीन सरपंच) 3) शशीकांत गजेंद्र पवार (तत्कालीन ग्रामसेवक) या तीघांनी संगणमताने त्या पाईप लाईनचे काम प्रत्यक्षात न करता त्याचे बनावट मुल्यांकन करुन जुन्या पाईप लाईनचे काम दर्शवले. त्या मोबदल्यात दि. 22.06.2017 ते 02.03.2018 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा कळंब येथुन 1)मुद्रीकाबाई साधुराम लिके, रा. खेर्डा, ता. कळंब (तत्कालीन सरपंच) 2) शशीकांत गजेंद्र पवार (तत्कालीन ग्रामसेवक) या दोघांनी संयुक्त स्वाक्षरीने 1,32,000/-रु. रक्कम प्राप्त करुन शासकीय पैशाचा अपहार केला आहे.
अशा मजकुराच्या श्री. तुकाराम जाधव, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कळंब यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीतांविरुध्द भा.दं.सं. कलम- 409, 420, 468, 471 अन्वये गुन्हा दि. 06.07.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी

पोलीस ठाणे, तुळजापूर: संतोष मोहन बागल, रा. कात्री, ता. तुळजापूर यांनी दि. 06.07.2020 रोजी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास मो.सा. च्या डिकीत 20,000/-रु. रक्कम ठेउन ती मो.सा. तुळजापूर येथील रोचकरी हॉस्पीटल समोर लावली होती. दरम्यान डिकीतील नमूद रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या संतोष बागल यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्‍द गुन्हा दि. 06.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, शिराढोण: किरण संतप मुंडे , रा. गोविंदपुर, ता. कळंब यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो. मो.सा. क्र. एम.एच. 13 सीपी 4576 ही दि. 04.07.2020 रोजी 14.30 वा. गोविंदपुर शिवारात लावली होती. ती मोटारसायकल 17.00 वा. त्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या किरण मुंडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 06.07.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments