उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, कळंब: इम्रान चॉदपाशा शेख, रा. बाबानगर, कळंब यांच्या बाबानगर येथील गुदामाचे शटर अज्ञात चोरट्याने दि. 23.07.2020 रोजी मध्यरात्री उचकटुन गुदामातील आईस्क्रीमचे खोकी, शितपेयांची खोकी, हलदीराम मिठाईची खोकी व गल्ल्यातील 5,000/-रु. रोख रक्कम असा एकुण 82,775/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या इम्रान शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 24.07.2020 रोजी नोंदवला आहे.
            दुसऱ्या घटनेत बप्पा साहेबराव आगळे, रा. वाठवडा, ता. कळंब यांनी दि. 20.07.2020 रोजी रात्री आपल्या घरासमोर लावलेली स्वत:ची स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एएफ 6716 ही मध्य रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या बप्पा आगळे  यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 25.07.2020 रोजी नोंदवला आहे.पोलीस ठाणे, शिराढोण: सुनिल बन्सी कापसे, रा. गौरगाव, ता. कळंब यांनी त्यांची बुलेट मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 8483 ही दि. 23.07.2020 रोजी 22.00 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी लावलेल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सुनिल कापसे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 25.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, तुळजापूर: राकेश राजकुमार राजदेव, रा. मंगळवार पेठ, तुळजापूर यांच्या मौजे सिंदफळ येथील शेत गट क्र. 217/2 मधील तुषारसिंचन संचाचे स्टँड पाईप, 12 नोजल व कुपनलीकेच्या विद्युत पंपाचे 100 फुट केबल (एकुण किं.अं. 16,000/-रु.) अज्ञात चोरट्याने दि. 12.07.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेले. अशा मजकुराच्या राकेश राजदेव यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 24.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments