Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलपोलीस ठाणे, तुळजापूर: पांडुरंग मसा चौगुले, वय 30 वर्षे, रा. वडारवाडा, वासुदेव गल्ली, तुळजापूर हे कुटूंबीताल सदस्य- हरीश्चंद्र, सरज, श्रीकांत,  बेबी शिंदे, जितेंद्र इटकर, अजित इटकर यांसह दि. 04.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरी होते. यावेळी गल्लीतीलच नातेवाईक- ममता चौगुले, गोकुळ पवार, सुरज पवार, संतोष पवार, जालिंदर पवार, राजु चौगुले, सुमन पवार, मुक्ता चौगुले या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन पांडुरंग चौगुले यांसह कुटूंबातील वर नमूद सदस्यांस शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सत्तुर, कुऱ्हाड, दगड- काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या पांडुरंग चौगुले यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आठ आरोपींविरुध्द भा.दंसं. कलम- 307, 324, 323, 143, 147, 148, 149, 109, 114, 188, 504, 506 सह म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: विकास साधु सुर्यवंशी, रा. मुळज, ता. उमरगा यांच्या शेतातून गावकरी- गोपाळ गोविंद सुर्यवंशी व परमेश्वर सुर्यवंशी, दोघे दि. 05.07.2020 रोजी 14.00 वा. सु. ट्रॅक्टर घेउन जात होते. पिकाचे नुकसान झाल्याने विकास सुर्यवंशी यांनी गोपाळ व परमेश्वर या दोघांना जाब विचारला असता त्या दोघांनी विकास सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले.
याच प्रकरणी सर्यवंशी कुटूंबातील सदस्य- विकास, प्रकाश, प्रविण, प्रशांत अशा चौघांनी दि. 05.07.2020 रोजी 12.00 वा. सु. मुळज शिवारात परमेश्वर गोविंद सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले.
अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंबातील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. उमरगा येथे दि. 05.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments