Header Ads

दोन वर्षांपासुन पाहिजे असलेला आरोपी अटक
 वाशी - विविध गुन्ह्यात पाहिजे- फरारी असलेल्या आरोपींच्या शोधार्थ मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी मोहिम सुरु केली आहे. वाशी पो.ठा. गु.र. क्र. 83/2018 या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी मुकेश दत्तु शिंदे, वय 25 वर्षे रा. पारधी पिढी, पिंपळगांव (क.), ता. वाशी यास स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आज दि. 06.07.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. वाशी च्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संताष गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.

जुगार प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., उस्मानाबाद (श.): 1) श्रीराम ओव्हाळ, रा. दारफळ, ता. उस्मानाबाद 2) रुपेश शेरखाने, रा. उस्मानाबाद हे दोघे दि. 06.07.2020 रोजी सांजा चौक, उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवित असतांना कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 630/-रु. सह पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., नळदुर्ग: महादेव सिध्दा मोरे, रा. गुजनुर, ता. तुळजापूर हा दि. 05.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 12 ली. गावठी दारु (किं.अं. 600/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळला. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मोटार वाहन कायदा उल्लंघन: 305 कारवाया- 67,100 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.

उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 05/07/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 305 कारवाया करुन 67,100 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.

No comments