सोलापूर शहरातून 3 वर्षांपुर्वी चोरीस गेलेली मोटारसायकल संशयीताकडून जप्त
स्थानिक गुन्हे शाखा: आंबेजवळगा तांडा, ता. उस्मानाबाद येथील सचिन सखाराम राठोड हा खोटा नोंदणी क्रमांक असलेली होंडा शाईन मोटारसायकल वापरत आहे. अशी गोपनीय माहिती स्था.गु.शा. च्या पोनि- श्री दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री. आण्णाराव खोडेवाड, पोहेकॉ-  रोकडे, पोकॉ- दिपक लाव्हरेपाटील, पांडुरंग सावंत, महिला पोकॉ- सोनवणे यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने आज दि. 28.07.2020 रोजी सचिन राठोड यास होंडा शाईन मोटारसायकलसह ताब्यात घेतले. या मो.सा. चा नोंदणी क्रमांक, मालकी- ताबा या विषयी तो पोलीसांना समाधानकारक माहिती देत नव्हता.
पथकाने त्या मो.सा. चा चासी- इंजीन क्रमांकाच्या आधारे ऑनलाईन शोध घेतला असता त्या मो.सा. चा नोंदणी क्र. खोटा असल्याचे आढळले. तसेच त्या मो.सा. चा खरा नोंदणी क्र. एम.एच. 13 बीएल 4796 असल्याचे व ती चोरीस गेल्याने विनायक मधुकर दंतकाळे, रा. म्हाडानगर, सोलापूर यांनी सोलापूर शहरातील एमआयडीसी पो.ठा. येथे गु.र.क्र. 451/ 2017 नुसार गुन्हा नोंदवल्याचे समजले. पथकाने ती मोटारसायकल जप्त करुन उर्वरीत कारवाईस्त सचिन सखाराम राठोड यास पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या ताब्यात दिले असुन उर्वरीत तपासकामी सोलापूर शहर पोलीसांचे सहकार्य घेतले जाणार आहे.       


नाकाबंदी दरम्यान 346 कारवाया- 59,600 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 27.07.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 346 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 59,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.


मनाई आदेशांचे उल्लंघन 170 पोलीस कारवायांत 10,000/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि.27.07.2020 रोजी खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 142 कारवायांत- 3,200/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 1 कारवाईत- 500/-रु. दंड प्राप्त.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 24 कारवायांत 4,800/-रु. दंड प्राप्त.
4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: 3 कारवायांत 1,500/- रु. दंड प्राप्त.

1 comment

Unknown said...

Well done osmanabad police