बेंबळीजवळ अपघात, दोन जखमीपो.ठा., बेंबळी: खंडु गोरोबा हमाल (वाघमोडे), रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद यांसह त्यांची पत्नी- योगेश्री असे होघे दि. 17.07.2020 रोजी 11.00 वा. सु. मौजे बामणी शिवारातील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 ईसी 2179 ने प्रवास करत होते. दरम्यान शिवाजी जगन्नाथ पवार, रा. भातांगळी, ता. उस्मानाबाद याने कार क्र. एम.एच. 24 एएस 0155 ही निष्काळजीपणे चालवून खंडू हमाल चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात खंडू हमाल यांसह त्यांची पत्नी- योगश्री गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या खंडु हमाल यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन संबंधी कार चालका विरुध्द गुन्हा दि. 21.07.2020 रोजी नोंदवला आहे.


मारहाण

पो.ठा., उमरगा: तात्याराव इंदु मुळे, रा. मुदगड (एकोजी), ता. निलंगा यांनी दि. 21.07.2020 रोजी 19.00 वा. सु. लातुर- उमरगा रस्त्यावरील मातोळा पाटीजवळ मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 3252 ही निष्काळजीपणे चालवून म्हशीच्या रेडकास धडक दिली. याचा जाब म्हैस मालक- वैभव सुर्यवंशी, मातोळा, ता. उमरगा यांनी मो.सा. चालकास विचारला असता तात्याराव मुळे व त्यांचे सोबतचे बळीराम मुळे अशा दोघांनी वैभव यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या वैभव सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 21.07.2020 रोजी नोंदवला आहे.अवैध मद्य प्रतिबंधक कारवाया

पो.ठा., मुरुम: नाशीकांत गोरोबा डावरे, रा. अचलेर, ता. लोहारा हा दि. 21.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 5 ली. गावठी दारु (किं.अं. 550/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला.

पो.ठा., तुळजापूर: खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने दि. 21.07.2020 रोजी तुळजापूर शहरातील हडको येथे एक स्विफ्ट डिझायर कार क्र. एम.एच. 14 सीएक्स 9243 थांबवून तीची तपासणी केली. या कारमधून आवेज हारुन रुईकर व चेनि गणेश मलंग, दोघे रा. उजणी, ता. औसा हे दोघे 180 मि.ली. च्या विदेशी दारुच्या 90 बाटल्या (किं.अं. 13,500/-रु.) विनापरवाना वाहतुक करत असतांना पथकाला आढळले.
यावरुन नमूद दोन्ही घटनांतील अवैध मद्य पोलीसांनी जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. जुगार प्रतिबंधक कारवाई

पो.ठा., उस्मानाबाद (ग्रा.): 1)राजकुमार येवडे 2)तानाजी कदम 3)दादा कदम 4)कुंडलिक कदम 5)पंडीत काळे 6)बालाजी कदम 7)अशोक कदम 8)रावसाहेब मचाले सर्व रा. भानसगाव, ता. उस्मानाबाद हे सर्व दि. 21.07.2020 रोजी मौजे भानसगाव येथे तिरट जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 4,650/-रु. कब्जात बाळगले असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments