बेंबळी: शेतीच्या वादातून हाणामारीबेंबळी: वसंत हरिश्चंद्र शिंदे, नानासाहेब शिंदे दोघे रा. सांगवी (का.), ता. उस्मानाबाद यांचा शेताच्या बांधाच्या हद्दीवरुन भाऊबंद- अनंत राजेंद्र शिंदे, दत्ता लक्ष्मण शिंदे यांच्याशी दि. 28.07.2020 रोजी 18.00 वा. सु. शेतात वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन लोखंडी गजाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परविरोधी दिलेल्या प्रथम खबरेवरुन स्वतंत्र 2 गुन्हे भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये  दि. 30.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


अवैध मद्य विक्रीविरोधी कारवाई

पोलीस ठाणे, कळंब: बनशीनाथ जनार्धन शिंदे, रा. भोगजी, ता. कळंब हा दि. 31.07.2020 रोजी मौजे भोगजी शिवारातील कळंब- बहुला रस्त्या लगत दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याचया उद्देशाने 180 मि.ली. च्या देशी- विदेशी दारुच्या 57 बाटल्या (किं.अं. 3,546/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. कळंब च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                    

No comments