मनाई आदेश झुगारुन विनापरवाना जिल्हा प्रवेश केला, 3 गुन्हे दाखल
उमरगा: कोविड- 19 संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्याती सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद आहेत. असे असतांनाही 1)लतीका अंबादास सोनकांबळे, रा. मानेगोपाळ, ता. उमरगा या दि. 15.07.2020 रोजी आराम बस क्र. ए. पी. 01 एम 298 ने प्रवास करत मुंबई येथून मानेगोपाळ येथे आल्या. तर, 2) मिरा काळे 3)सुनिता काळे, दोघी रा. माडज, ता. उमरगा या दोघी दि. 12.07.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे माडज येथे आल्या. तसेच 4) काशिनाथ वाडेकर व त्यांची दोन मुले, रा. हिप्परगाराव, ता. उमरगा हे तीघे दि. 13.07.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे हिप्परगाराव येथे आले. अशा प्रकारे नमूद सर्वांनी कोविड- 19 संसर्ग होण्याची शक्यता निर्माण करण्याचे निष्काळजीपणाची कृती केली आहे.

यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द पो.ठा. उमरगा येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अवैध मद्य प्रतिबंधक कारवाया.
पो.ठा., ढोकी: महादेव सोमनाथ पेटे, रा. तेर, ता. उस्मानाबाद हा दि. 16.07.2020 रोजी मौजे तेर येथील जनता धाब्यामध्ये दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 4,574/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. ढोकी च्या पथकास आढळला.

पो.ठा., कळंब: कळंब पो.ठा. चे पथक दि. 16.07.2020 रोजी कळंब शहरात गस्त करत होते. गस्ती दरम्यान 18.20 वा. सु. कळंब शहरातील कळंब- भाटसांगवी रस्त्यालगत असलेल्या ‘हॉटेल न्यु शिवनेरी’ या धाब्यावर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला असता अजित बंडू कोल्हे, रा. भाटसांगवी, ता. कळंब हा दारुचा विनापरवान विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 87 तर विदेशी दारुच्या 11 बाटल्या (एकुण किं.अं. 7,674/-रु.) कब्जात बाळगला असतांना पथकास आढळला.

       यावरुन पोलीसांनी दारु जप्त करुन नमूद दोन्ही आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
No comments