Header Ads

मनाई आदेश झुगारुन हॉटेल चालू ठेवले, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे,उस्मानाबाद (श.): कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दि. 04.07.2020 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागु होता. असे असतांनाही सदर आदेश झुगारुन रावसाहेब गुंडरे, रा. उस्मानाबाद यांनी काळा मारुती- ताजमहल टॉकी रोडलगतचे ‘जीवन टी हाऊस’ 14.30 वा. सु. व्यवसायास चालू ठेवले.

यावरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोउपनि श्री- दिनेश जाधव यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्यांच्याविरुध्द गुन्हा दि. 04.07.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


 “मारहाण.

पोलीस ठाणे, ढोकी: काजोल नवनाथ शितोळे, रा. किणी, ता. उस्मानाबाद यांची बहीण दि. 02.07.2020 रोजी 18.00 वा. सु. गावातील सार्वजनिक हातपंपावर पाणी भरण्यास गेली होती. यावेळी कॉलनीतीलच- ललीता शिंदे, नितीन शिंदे, सविता शिंदे, सचिन शिंदे यांनी काजोल यांच्या बहीणीस शिवीगाळ केली. त्याचा जाब काजोल शितोळे यांनी ललीता शिंदे यांना विचारला असता त्यावर चिडुन जाउन नमूद चौघांनी काजोल शितोळे यांसह त्यांचे आई- वडील यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या काजोल शितोळे यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघा आरोपींविरुध्द गुन्हा दि. 04.07.2020 रोजी नोंदवला आहे.


मनाई आदेशांचे उल्लंघन 154 पोलीस कारवायांत 35,300/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 03.07.2020 रोजी खालील प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 109 कारवायांत- 21,500/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 6 कारवायांत- 3,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 13 कारवायांत 2,600/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 26 कारवायांत 8,200/- रु. दंड प्राप्त झाला आहे.


No comments