उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल तामलवाडी: अमर नवनाथ वडणे, रा. माळुंब्रा, ता. तुळजापूर यांनी स्वत:ची होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 2490 ही दि. 28.07.2020 रोजी मध्यरात्री राहत्या घरा समोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती मो.सा. अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अमर वडणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 29.07.2020 रोजी नोंदवला आहे.

 तुळजापूर: धोंडीबा धनाजी मस्के, रा. पिंपळा (खुर्द), ता. तुळजापूर यांनी स्वत:ची हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 9937 ही दि. 28.07.2020 रोजी 15.30 वा. सु. तुळजापूर येथील एसबीआय बँके समोर लावली असता अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या धोंडीबा मस्के यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 29.07.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद : रामेश्वर किसन निचळ, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद यांनी सवत:ची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 13 एआर 6894 ही दि. 20.07.2020 रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती दुसऱ्या दिवशी लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती मो.सा. अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या रामेश्वर निचळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.07.2020 रोजी नोंदवला आहे.No comments