Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखलपोलीस ठाणे, आंबी: भोसले वस्ती परिसर, मौजे शेळगांव, ता. परंडा येथे दि. 29.06.2020 रोजी 09.45 वा. सु. तलाठी- अर्जुन नागलोत यांना डंपर क्र. एम.एच. 12 एयु 5867 मध्ये 4 ब्रास वाळु (गौन खनिज) किं.अं. 19,312/-रु. ची विनापरवाना वाहतुक होत असतांना आढळला. यावर तलाठी- अर्जुन नागलोत यांनी डंपर चालकास डंपर पोलीस ठाण्यास घेउन चलण्यास सांगीतले असता नमूद डंपरच्या अज्ञात चालकाने तसे न करता डंपर घेउन पळून गेला. अशा मजकुराच्या सज्जा- शेळगांव तलाठी- अर्जुन नागलोत यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत डंपर च्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 02.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: जगन्नाथ विश्वनाथ सुर्यवंशी, रा. बाबळसुर, ता. उमरगा यांच्या मौजे बाबळसुर येथील शेततळ्यातील 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप व स्टार्टर एकत्रीत किं.अं. 11,000/-रु. चा माल दि. 27.06.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या जगन्नाथ सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: फिरोज सय्यद, रा. चोराखळी, ता. कळंब यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 4229 ही दि. 20.06.2020 रोजी 12.30 वा. सु. तहसील कार्यालय, कळंब च्या परिसरात लावली होती. तीचा शोध घेतला असता त्यांना ती आढळुन आली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या फिरोज सय्यद यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 03.07.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments