फोनवरुन महिलेस धमक्या दिल्या, गुन्हा दाखलउस्मानाबाद -  पुणे- सातारा परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिलेस (नाव- गाव गोपनीय) दि. 04.07.2020 ते 13.07.2020 दरम्यान वेळोवेळी मोबाईल फोनद्वारे कॉल व लघु संदेश करुन शिवीगाळ करुन धमक्या दिल्या. यावरुन त्या महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या तरुणाविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


अपघात
मुरुम: जाफर अब्दुलकादर शिकलकर व अब्दुलकादर शिकलकर, दोघे रा. मुरुम, ता. उमरगा हे दोघे दि. 05.06.2020 रोजी 15.20 वा. सु. मौजे मुरुम येथील माधवराव पाटील कॉलेज समोरील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एयु 9186 वरुन जात होते. यावेळी एका अनोळखी मो.सा. चालकाने मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवून जाफर शिकलकर चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात पाठीमागे बसलेले अब्दुलकादर शिकलकर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीस उपचारास न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधी मो.सा. चालक घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या जाफर शिकलकर यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत अनोळखी मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 15.07.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण

 तामलवाडी: धुळोबा भगवान मार्कड, रा. गोंधळवाडी, ता. तुळजापूर हे दि. 14.07.2020 रोजी 11.30 वा. सु. गावातील- लक्ष्मण बाबा शिरगिरे यांच्या शेतात गेले असता लक्ष्मण शिरगिरे यांसह त्यांच्या कुटूंबातील- बाबा, उज्वल, भागुबाई अशा चौघांनी आपल्या शेतात आल्याच्या कारणावरुन धुळोबा मार्कड यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गजाने, चाबकाने, मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या धुळोबा मार्कड यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 15.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments