Header Ads

पोलीस चेक पोस्टच्या अडथळ्यांना कारची धडक, गुन्हा दाखलपोलीस ठाणे, तामलवाडी: कोविड- 19 संसर्गास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने जिल्ह्याच्या सर्व सिमांवर तात्पुरते पोलीस चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. दि. 01.07.2020 रोजी 22.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील तामलवाडी चेक पोस्टवर पोलीस वाहने तपासत होते. यावेळी पोलीसांना टाळून विनापरवाना जिल्हा हद्द ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात चालक- प्रदिप वडणे, रा. तुळजापूर याने फोर्ड फीगो कार क्र. एम.एच. 20 बीएन 3180 ही भरधाव चालवल्याने अनियंत्रीत होउन चेक पोस्ट अडथळ्यांस धडकल्याने अडथळ्यांचे नुकसान झाले. यावरुन सरकार तर्फे पोकॉ- अनिल सुखदेव मोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चालकाविरुध्द गुन्हा दि. 02.07.2020 रोजी नोंदवला आहे.

मोटार वाहन कायदा उल्लंघन: 161 कारवाया-33,300 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.
जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि.01/07/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 161 कारवाया करुन 33,300 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.


No comments