Header Ads

8 वर्षांपासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत




 परंडा -  परंडा पो.ठा. गु.र. क्र. 98/2012 भा.दं.सं. कलम- 394 या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- शहाजी कल्याण शिंदे, वय 32 वर्षे, रा. तांदुळवाडी, ता. परंडा हा तपासकामी पोलीसांना हवा होता. त्‍यास स्था.गु.शा. च्या पथकाने खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. 18.07.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. परंडा च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि.-  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- काझी, पोना- कुनाल दहीहांडे, पोकॉ- सर्जे, आर्सेवाड, महिला पोकॉ- होळकर यांच्या पथकाने केली आहे.


नाकाबंदी दरम्यान 281 कारवाया- 74,300 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद -  कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 17.07.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 281 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 74,300 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.


मनाई आदेशांचे उल्लंघन 145 पोलीस कारवायांत 33,800/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद  - कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि.17.07.2020 रोजी खालील दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 81 कारवायांत- 16,200/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 6 कारवायांत- 3,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 12 कारवायांत 2,400/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 46 कारवायांत 12,200/- रु. दंड प्राप्त झाला आहे.

No comments