Header Ads

पोलीसांच्या सतर्कतेने बालविवाह टळला
शिराढोण: शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील मुस्लीम कुटूंबातील मुलीचा बालविवाह आज दि. 09.07.2020 रोजी दुपारी होणार होता. याची गोपनीय खबर शिराढोण पोलीसांना मिळाली. यावर सपोनि- श्री उत्तम जाधव, पोहेकॉ- पठाण यांनी संबंधीत गावचे ग्रामसेवक अन्य पदाधिकारी यांना समवेत घेउन 10.30 वाजताच मुलीचे घर गाठले. त्या मुलीचे व तीच्या आई- वडीलांचे, नवरदेव व त्याचे पालक या सर्वांना कायदेशीर तरतुदी यांची जाणीव करुन देउन त्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावर दोन्ही पक्षांनी मुलीची 18 वर्षे वय पुर्ण होई पर्यंत विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.


No comments