Header Ads

मनाई आदेशांचे उल्लंघन 134 पोलीस कारवायांत 30,400/-रु. दंड वसुलउस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती निवारण प्राधिकरण यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 08.07.2020 रोजी खालील मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 104 कारवायांत- 20,800/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 4 कारवायांत- 2,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 5 कारवायांत 1,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 21 कारवायांत 6,600/- रु. दंड प्राप्त झाला आहे.

अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., येरमाळा: सिमा अंकुश शिंदे, रा. खामकरवाडी, ता. वाशी या दि. 08.07.2020 रोजी मौजे पानगांव शिवारातील उंबरा फाटा येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 700/-रु.) कब्जात बाळगल्या असतांना पो.ठा. येरमाळा च्या पथकास आढळल्या. पोलीसांनी नमूद दारु जप्त करुन त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

मोटार वाहन कायदा उल्लंघन: 284 कारवाया- 53,200 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.
उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 08/07/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 284 कारवाया करुन 53,200 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.

No comments