पोलीस पाटलाने बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, उमरगा: भास्कर किसनराव पाटील, रा. हिप्परगांव, ता. उमरगा (पोलीस पाटील) यांनी पोलीस पाटील पदाची मुदत वाढवून घेण्यासाठी त्यांच्या शालेय कागदपत्रातील मुळ जन्म दिनांकात खाडाखोड करुन ते कागदपत्र दि. 31.12.2015 ते 27.11.2018 या कालावधीत उमरगा येथील एसडीएम कार्यालयात सादर करुन शासनाची फसवणूक केली आहे. यावरुन मंडळ अधिकारी, प्रताप राजाराम दुधभाते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भास्कर पाटील यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 420, 465, 468, 471 अन्वये गुन्हा दि. 02.07.2020 रोजी नोंदवला आहे.


जुगार अड्ड्यावर छापा.”
पोलीस ठाणे, कळंब: 1)पांडुरंग गायकवाड, रा. आंबेहोळ, 2)अमोल गायकवाड, रा. झोरे गल्ली, उस्मानाबाद 3)सोमनाथ चपने, रा. उस्मानाबाद हे तीघे दि. 02.07.2020 रोजी उस्मानाबाद येथील पांडुरंग गायकवाड यांच्या टपरी समोर कल्याण मटका जुगार खेळतांना जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम, मोबाईल फोन सह एकुण 5,850/-रु. च्या मालासह पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळुन आले. यावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

शासन आदेशांचे उल्लंघन 85 पोलीस कारवायांत 22,700/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 02.07.2020 रोजी खालील प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 44 कारवायांत- 8,800/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 4 कारवायांत- 2,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 7 कारवायांत 1,400/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 30 कारवायांत 10,500/- रु. दंड प्राप्त झाला आहे.


No comments