Header Ads

उमरगा: अल्पवयीन मुलीचे अपहरण
पोलीस ठाणे, उमरगा: एका 17 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे अमिष दाखवून एका तरुणाने (नाव- गाव गोपनीय) भावाच्या मदतीने दि. 01.07.2020 रोजी 22.00 वा. सु. राहत्या घरुन अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या प्रथम खाबरेवरुन संबंधीत दोन तरुणांविरुध्द गुन्हा दि. 03.07.2020 रोजी नोंदवला आहे. “मारहाण.
पोलीस ठाणे, ढोकी: सविता सचिन शिंदे, रा. किणी, ता. उस्मानाबाद यांची मुलगी दि. 02.07.2020 रोजी 16.30 वा. सु. गावातील सार्वजनिक हातपंपावर पाणी भरण्यास गेली होती. यावेळी कॉलनीतीलच- अनुसया शितोळे यांनी सविता यांच्या मुलीला शिवीगाळ केली. त्याचा जाब सविता शिंदे यांनी अनुसया शितोळे यांना विचारला असता त्यावर चिडुन जाउन अनुसया शितोळे यांसह नवनाथ शितोळे, स्वाती सुर्यवंशी अशा तीघांनी सविता शिंदे यांसह त्यांची जाऊ- ललिता व सासु- सुमन यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सविता शिंदे यांच्या फिर्यादीवरुन नमूद तीघा आरोपींविरुध्द गुन्हा दि. 03.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: प्रभावती कुंभार, रा. कदमापुर, ता. उमरगा या दि. 02.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर काम करत होत्या. यावेळी शेजारील भाऊबंद- गजराबाई कुंभार, सोनाबाई कुंभार, विश्वंभर कुंभार या तीघांनी शेतातील बंधाऱ्यावरुन रहदारीच्या कारणावरुन प्रभावती कुंभार यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रभावती कुंभार यांच्या फिर्यादीवरुन नमूद तीघांविरुध्द गुन्हा दि. 03.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments