उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य प्रतिबंधक कारवाया
पो.ठा., उमरगा: माधव सोमला चव्हाण, रा. बलसुर तांडा, ता. उमरगा हा दि. 19.07.2020 रोजी मौजे बलसुर येथील महावितरण कार्यालयाच्या बाजूस दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 19 ली. गावठी दारु (किं.अं. 975/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला.

पो.ठा., लोहारा: लक्ष्मण कल्लाप्पा कांबळे, रा. कानेगांव, ता. लोहारा हा दि. 19.07.2020 रोजी मौजे कानेगांव येथे दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 44 बाटल्या (किं.अं. 2,640/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला.

पो.ठा., बेंबळी: प्रदीप अनंतराव फावडे, रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद हा दि. 19.07.2020 रोजी मौजे समुद्रवाणी पाटी जवळील विशाल ढाब्याच्या बाजस दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी- विदेशी दारुच्या 48 बाटल्या (किं.अं. 2,790/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी च्या पथकास आढळला.

पो.ठा., मुरुम: विकास मिट्टु पवार, रा. नाईकनगर (सु.), ता. उमरगा हा दि. 20.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर चारुची अवैध विक्री करत असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल लागताच तो घटनास्थळावरुन पळून गेला. पोलीसांनी घटनास्थळावरुन दोन लबरी नळ्यांमध्ये असलेली 50 ली. गावठी दारु जप्त केली आहे.

No comments