Header Ads

सुनेचा छळ, गुन्हा दाखल
नळदुर्ग: सुन- पद्मजा ज्ञानेश्वर जाधव, रा. येडोळा, ता. तुळजापूर यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1) ज्ञानेश्वर बलभिम जाधव (पती) 2)बलभिम जाधव (सासरा) 3)अनुसया जाधव (सासु) 4)दत्तात्रय जाधव (दीर), चौघे रा, येडोळा 5)गीता माने (नणंद) 6)दरी माने (नंदवा) दोघे रा. तुगाव, ता. उमरगा या सर्वांनी सुन- पद्मजा यांना वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. तसेच दि. 08.07.2020 रोजी 23.00 वा. सु. मौजे येडोळा येथे राहत्या घरी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पद्मजा जाधव यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी
उस्मानाबाद (श.): बळीराम विठ्ठल देवकर, रा. जाधववाडी रोड, उस्मानाबाद यांनी त्यांची होंन्डा लिवो मो.सा. क्र. एम.एच. 25 एएफ 4683 ही दि. 04.07.2020 रोजी रात्री 21.30 वा. सु. उस्मानाबाद येथील शिववैष्णवी नागरी पतसंथे समोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ती लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन नमूद मो.सा. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या बळीराम देवकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.

अपघात
आनंदनगर: अब्दुल मजीद शेख, वय 40 वर्षे, रा. उस्मानाबाद हे दि. 08.07.2020 रोजी 19.30 वा. सु. उस्मानाबाद शहरात बँक कॉलनी परिसरातील बालाजी लाँड्री समोरील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 7401 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवून अब्दुल शेख यांना जोराची धडक दिली. या अपघातात अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अब्दुल शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद मो.सा. च्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments