बेंबळी: मोटारसायकलने धडक दिल्याने एकाचा मृत्यूबेंबळी: सचिन मारुती माडेकर, वय 36 वर्षे, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद हे दि. 22.07.2020 रोजी 23.00 वा. सु. रुईभर येथील बेंबळी- उस्मानाबाद रस्त्याने पायी चालत जात होते. दरम्यान विशाल बाळासाहेब सिरसाट, रा. उस्मानाबाद यांनी मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 8299 ही निष्काळजीपणे चालवून सचिन माडेकर यांना जोराची धडक दिल्याने ते उपचारादरम्यान मयत झाले. अपघातानंतर नमूद मो.सा. चालक घटनास्थळावरुन मो.सा. सह निघून गेला. अशा मजकुराच्या महादेव मारुती माडेकर यांनी पो.ठा. बेंबळी आकस्मात मृत्यु क्र. 30/2020 सी.आर.पी.सी. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन विशाल सिरसट यांच्याविरिुध्द गुन्हा दि. 29.07.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी
 तामलवाडी: तानाजी भिका बोचरे, रा. सुरतगाव, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 28.07.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरातील कपाटातील 1,30,000/-रु. चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या तानाजी बोचरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 29.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments