Header Ads

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केला, गुन्हा दाखल


पो.ठा., ढोकी: काशीनाथ हनुमंत भोजने, रा. चिखली यांच्या मौजे भंडारवाडी, ता. उस्मानाबाद येथील शेत गट क्र. 216, 232 मधील शेताच्या वहीवाट संरक्षणार्थ पो.ठा. ढोकी चे पोहेकॉ- प्रकाश विठोबा राठोड हे अन्य शासकीय कर्मचाऱ्यांसह दि. 04.07.2020 रोजी 11.00 वा. सु. नमुद शेतात गेले होते. यावेळी मौजे भंडारवाडी येथील काकासाहेब गणपत पाटील, संगमेष पाटील, कुणाल पाटील, शंकर पाटील, रोहीत पाटील या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडवणूक केली. यावेळी पोहेकॉ- प्रकाश राठोड यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस- अन्य शासकीय कर्मचारी यांना विरोध करुन अर्जदार- काशीनाथ भोजने यांना शेतात आलात तर एकऐकाचा खुन करु. असे धमकावून शिवीगाळ केली.

यावरुन पोहेकॉ- प्रकाश राठोड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद पाच आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 143, 146, 149, 341, 447 सह म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा दि. 04.07.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार अड्यावर छापा.
पो.ठा., नळदुर्ग: सतिश मारुती माने, रा. आष्टा कासार, ता. लोहारा हा दि. 04.07.2020 रोजी बस स्थानक नळदुर्ग च्या पाठीमागील शेडमध्ये कल्याण मटका जुगार खेळत व खेळवित असतांना कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 1,780/-रु. च्या मालासह पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विक्री विरोधी कारवाया.
पो.ठा., मुरुम: दिलीप शांताप्पा बिराडे, रा. आलुर, ता. उमरगा हा दि. 04.07.2020 रोजी मौजे आलुर येथील शरद समन यांच्या दुकानाच्या पाठीमागे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना 10 ली. गावठी दारु किं.अं. 1,080/-रु. च्या मालासह पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला.
पो.ठा., शिराढोण: गणेश रामदास माने, रा. नागुलगांव, ता. कळंब हा दि. 04.07.2020 रोजी मौजे लोहटा (पु.) येथील हॉटेल सार्थक येथे दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 30 व विदेशी दारुच्या 8 बाटल्या (एकुण किं.अं. 4,000/-रु.) कब्जात बाळगला असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांच्या पथकास आढळला.
       यावरुन वरील दोघांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments