उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखलपोलीस ठाणे, तुळजापूर: किरण सतीश बंडगर, रा. चव्हाण कॉम्पलेक्स जवळ, तुळजापूर यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 6382 ही दि. 28.07.2020 रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. दुसऱ्या दिवशी ती त्यांना लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या किरण बंडगर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, परंडा: विरेंद्र विलासराव उंदरे, रा. वाशी यांनी त्यांचे महिंद्रा एक्स युव्ही वाहन क्र. एम.एच. 24 एए 0025 हे दि. 29.07.2020 रोजी मध्यरात्री भुम- वारदवाडी रस्त्यालगत असलेल्या हॉटेल गारवा येथे लावले होते. दुसऱ्या दिवशी ते वाहन त्यांना लावल्या जागी आढळले नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ते चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या विरेंद्र उंदरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): सुजीत राजेंद्र गुंडाळे, रा. बार्शी नाका, उस्मानाबाद हे उस्मानाबाद येथील शिवाजी चौकात ‘अमृत तुल्य चहा’ हॉटेल चालवतात. हे हॉटेल चालवायचे असेल तर आम्हाला प्रती माह 5,000/-रु. किंवा एक रकमी 1,00,000/-रु. रोख रक्कम द्यावी लागेल. अन्यथा तुला येथे व्यवसाय करु देणार नाही.” अशी धमकी देउन खंडणीची मागणी 1)राहुल मरबु मंजुळे उर्फ छोट्या 2)शिवाजी लक्ष्मण जाधव 3)लहु महेंद्र घोडके, तीघे रा. वडार गल्ली, उस्मानाबाद यांनी सुजीत गुंडाळे यांना अनेकदा केली. सुजीत गुंडाळे यांनी त्यांना दाद न दिल्याने नमूद तीघांनी त्यांना येता- जाता शिवीगाळ करणे, चहा पिउन त्याचे पैसे न देणे, हॉटेलच्या  ओट्यावर, शटरच्या कुलूपावर लघु शंका- संडास करणे अशा प्रकारे त्रास देणे सुरु केले. तसेच दि. 29.07.2020 रोजी 22.00 वा. नमूद तीघांनी गुंडाळे यांना खंडणी न दिल्यास हॉटेल जाळण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी  देउन गुंडाळे यांच्या खिशातील 5,600/-रु. रक्कम हिसकावून हॉटेलच्या फलकावर दगड मारुन नुकसान केले.

             अशा मजकुराच्या सुजीत गुंडाळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 392, 386, 269, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


No comments