Header Ads

मनाई आदेश झुगारुन निष्काळजीपणाचे कृत्य केले, गुन्हा दाखल
 शिराढोण: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने सी.आर.पी.सी. कलम- 144 अन्वये जमावबंदी आदेश अंमलात आहे. असे असतांनाही 1)उध्दव घुले 2)गोविंद काळे 3)विश्वजीत नाथजोगी 4)तात्यासाहेब शिंदे 5)गौतम ढगे 6)संतोष सांजेकर 7)संदेश टोपे 8)नवनाथ शिरसाट 9)समाधान शिंदे 10)राजाभाउ कातमोडे, सर्व रा. लोहटा (पु.) 11)विनोद झाडके 12)गणेश शिंदे, दोघे रा. कोथळा 13)अक्षय कोळी, रा. हिंगणगाव 14)बाबुराव भोरे, रा. नागुलगाव 15)वैभव हैसलमल, रा. कळंब 16)अक्षय पवार, रा. करजकल्ला या सर्वांनी दि. 04.07.2020 रोजी 22.00 वा. सु. नाका- तोंडास मास्क न लावता मौजे लोहटा (पु.) येथील ‘हॉटेल सार्थक’ येथे एकत्र जमून निष्काळजीपणाचे कृत्य केले. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments